मात्र आता प्रश्न निर्माण होतो की जिथे तीन तलाक,राम मंदिर, कलम 370 असे धडाडीचे निर्णय घेतले गेले तिथे या महत्त्वपूर्ण निर्णयाला इतका विलंब का ? न्यायाव्यवस्थेतील हा विलंब हा त्या पीडीतेचा आणि अगदी कमी वेळात गुन्हेगारांना पकडणऱ्या त्या पोलिसांचा नक्कीच अपमान आहे.
आजही कित्येक ठिकाणी अशा घटना घडतात कारण त्या नराधमांना कायद्याचे भय उरले नाही. आणि म्हणूनच या अशा गुन्ह्यांंसाठी कायदे कठोर व्हायला हवेत आणि या गुन्ह्याचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा अशी शासन दरबारी विनंती.